दोन्ही क्लब मध्ये रम्मी आणि तीन पत्ते रात्र्यंदिवस चालू
स्थानिक पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी गुन्हे अन्वेषण विभाग यांचे दुर्लक्ष यांनी जर जातीने लक्ष दिले तर कुठलेच अवैद्धं धदा चालू शकनार नाहीत
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
85 30 83 87 12
माणगाव आणि गोरेगाव लोनेरे हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. माणगाव ढालघर आणि लोनेरे येथे राजरोसपणे अवैध मटका जुगार, तीन पत्ते, 13 पानी रम्मी,21 पानी रम्मी, 27पानी रम्मी सुरु असून दोन्ही क्लब मध्ये रम्मी आणि तीन पत्ते रात्र्यंदिवस चालू असतो
याकडे स्थानिक माणगाव पोलीस आणि गोरेगाव पोलीस यांचे दुर्लक्ष होत आहे. शहराचा विकास झपाट्याने होत असून या शहरात माञ अवैध धंद्याना ऊत आला आहे. पैशाच्या अमिषाला भुलून अनेक गरीब कुटुंब उद्धवस्त होत असून पोलिस यंत्रणेचे जानुन बुजून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड.काशिनाथ ठाकुर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका जुगार धंद्यानबाबत सामाजिक कार्यकर्ते अँड काशिनाथ ठाकूर यांनी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. ही लढाई गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध धंद्या विरोधात 15आगस्ट रोजी मंत्रालयाच्या गेट समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला असता.
रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी अवैध मटका जुगार धंदे बंद करण्यात आले होते. काही दिवस उलटल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये अवैध मटका जुगार धंद्याने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे माणगाव ढालघर आणि लोनेरे येथे सुरू असलेल्या अवैध मटका जुगार पत्याचे क्लब धंदा राजरोसपणे सुरू आहे.
अशा अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. कोरोना काळात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली असून काही लोकांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या आहेत. त्यामुळे गावाकडे रोजमदारीवर काम करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु पैशाच्या लोभामुळे बरेच लोक कमीवेळात जास्त पैसा मिळत असल्यामुळे या अवैध धंद्याकडे वळले असून कल्याण, मेन, डे महाराष्ट्र यावर आकडे, पाना लावून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रिजल्टची वाट पाहत असतात.हे मटका खेळणारे हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोक दिवस भर मोलमजुरी करून सध्याकाळी मिळणारी मजूरी अधिक पैसे मिळतील या आशेने मटका, क्लब मध्ये खेळून पैशाची बरबादी करून कुटुंब उध्दवस्त करीत आहेत.मटका क्लब मध्ये खेळणा-या काही जणांना कमिवेळात पैसा मिळत असल्यामुळे हा पैसा व्यसानाधिनतेकडे जात आहे त्यामुळे अनेक कुटूंब उध्दवस्त झाली आहेत. यामध्ये मटका चालक दिवसेन दिवस गब्बर होत असून मोलमजूरी करणारे मात्र देशोधडीला लागले असून त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. माणगाव आणि गोरेगाव पोलिसांनी अवैध मटका धंद्यावर त्वरित कारवाई करून सर्वसामान्य गरीब जनतेचे कुटुंब वाचवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड.काशिनाथ ठाकुर यांनी केली आहे.