प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
दिनांक २७/०७/२०२३ रोजी रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भुवनेश्वर येथील बंद असलेल्या बंगल्यात चोरट्यांनी खिडकीची ग्रिल उचकटून बंगल्यातील ३०. ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो वजनाचे चांदीचे भांडे असा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारून पलायन केले होते. त्याबात रोहा पोलीस ठाणेकडे गु.र. नं. १२४ / २०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरोधात दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा रायगड अलिबाग करीत होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग कडील पोलीस हवालदार अमोल हंबीर, पोशि/ ईश्वर लांबोटे, यांनी केलेल्या तांत्रिक अन्वेषणावरून सदर गुन्हयातील आरोपी मध्यप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड, बाळासाहेब खाडे, यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखालील सहायक पोलीस निरीक्षक/ नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक / धनाजी साठे, पोलीस हवालदार अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक / विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई/ ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, अशी टिम गठीत केली. सदर टिमने मध्यप्रदेश येथील दुर्गम भागातील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे येथे जावून मध्यप्रदेश येथील गुन्हे शाखेचे एएसआय/भैरवसिंग देवडा, एएसआय/ रामसिंग गोरे पोशि/ आर. बलराम, आरक्षक / प्रशांत सिंग चौहान, यांच्या मदतीने दुर्गम भागातील आरोपी १. कैलास कमरू डावर, वय २६ वर्षे, २. निहाल सिंग गोवन सिंग डावर, वय ४० वर्षे, ३. सोहबत इंदरसिंग डावर, वय - ३६ वर्ष, सर्व रा. गेटा ता.कुक्षी जि.धार, राज्य मध्यप्रदेश यांना गुन्हयाचे कामी धैर्याने ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी रोहा येथे घरफोडी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली.
सदर आरोपीत यांना स्था. गु. शा. शाखेकडे आणून त्यांना गुन्हयाचे कामी अटक करून त्यांच्याकडून गुन्हयात गेलेला एकुण माल ३०.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो वजनाचे चांदीचे भांडे असा एकूण ०९,३५,०००/-रुपये किमतीचा संपुर्ण १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करून गुन्हयाचे कामी जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. धनाजी साठे, नेमणुक स्था. गु.शा. रायगड अलिबाग हे करीत आहेत.
तरी मा. पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बाळासाहेब खाडे, यांचे अधिपत्याखालील सहायक पोलीस निरीक्षक/ नागेश कदम, पोलीस उप निरीक्षक/ धनाजी साठे, पोलीस हवालदार/ अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, पोलीस नाईक / विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलीस शिपाई/ईश्वर लांबोटे, अक्षय सावंत, सायबर विभागाचे पोना/ तुषार घरत, पोशि/ अक्षय पाटील यांनी यांनी रोहा येथील घरफोडीतील आरोपींना मध्यप्रदेश येथील गेटा गांव, तांडा पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागातून ताब्यात घेवून चोरी केलेला सर्व १०० टक्के मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.