प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
माननीय पोलीस महानिरीक्षक कोकाण परीक्षेत्र, नवी मुंबई तसेच पोलीस अधीक्षक रायगड यांना गोपनीय बातमी मिळाली की मांडव्या जवळ समुद्रात बोटीतुन अवैध डिझेल ची वाहतूक व साठा होत असल्याबाबत, माहिती मिळाल्याने सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड, अतुल झेंडे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी रसायनी पोलीस ठाणे व त्यांच्याकडील स्टाफ अशी टिम तयार करून कारवाई करण्याची सुचना केल्याने पोलीस निरीक्षक माळी व पथकाने मांडवा सागरी पोलीस ठाणे हददीतील गोपनीय बातमी प्रमाणे मौजे रेवस पकटीजवळील रेवस खाडीमध्ये उभ्या करून ठेवलेल्या बोटीमध्ये जावून कारवाई केली असून खालील प्रमाणे बोटी व अवेद्य डिझेल व संशयित इसम यांना ताब्यात घेतले आहे.
१) कन्हैया साई IND-MH-7-MM-710 या बोटीमध्ये एकूण १८,००० लिटर हिरव्या रंगाचा डिझेल यांत्रिक बोटीसह एकूण किमंत ३६,९२,०००/- रू. मिळुन आला तसेच बोटीमध्ये असलेले इसम १ ) जियाउल्लख असरावली शेख वय ३५ वर्ष, रा. दिवाला गांव, पप्पु कोळी यांची चाळ, बेलापुर नवी मुंबई, २) दर्शन रमेश नाखवा वय ४० वर्ष, रा. बोडणी, ता. अलिबाग, ३) कमल ब्रदिप्रसाद बर्मन वय ३४ वर्ष, रा. हाशिवरे, स्टेट बॅक ऑफ इंडिया समोर, ता. अलिबाग, ४) राजु कारू महतो, वय ४१ वर्ष, रा. खरकी, पो. खरकी, पोलीस ठाणे -
विष्णुगर, जि. हजारीबाग, राज्य झारखंड यांना बोट व अवैद्य डिझेलसह ताब्यात घेण्यात आले. २) श्री गजलक्ष्मी माता IND-MH-7-MM-3150 याबोटीमध्ये एकुण २८,००० लिटर हिरव्या
रंगाचे डिझेल यांत्रिक बोटीसह एकूण किमंत ६६,३२,०००/- रू. मिळुन आला, तसेच बोटीमध्ये असलेले इसम १) निसर्ग गणेश नाखवा वय ३१ वर्ष, रा. बोडणी ता. अलिबाग २) निकेश गणेश नाखवा वय २५ वर्ष रा. बोडणी ता. अलिबाग, ३) पुनित डहरू उरा वय २९ वर्ष, रा. हुटरी, पो. ताटवा, पोलीस ठाणे- चानो, ता. जि. रांची, राज्य झारखंड, ४) बिनेय जटल गुरी, वय ३२ वर्ष, रा. जमनी जरा, पो. पोनार डेम, ता. बिषणोराड जि. हाजिराबाग, राज्य झारखंड ५) प्रेम खेमन महातो, वय ४३ वर्ष, रा. नारायण पुर, ता. पैक, जि. बोकारी इस्टिलसिटी, राज्य झारखंड, यांना बोट व अवैद्य डिझेलसह ताब्यात घेण्यात आले.
वरील दोन्ही बोटीवरील ९ इममांना फौजदारी प्रक्रीया संहिता कलम ४१ (१) (ड) ताब्यात घेतले असून त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या विवक्षित मालमत्ता त्यात दोन बोटी व त्यामधील हिरव्या रंगाचे डिझेल एकूण यांत्रिक बोटीसह किमंत १,०३,२४,०००/- रूपये. अशी मालमत्ता फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १०२ प्रमाणे जप्त करण्यात आलेले आहे.
पुढील तपासाची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड, अतुल झेंडे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी रसायनी पोलीस ठाणे हे करीत आहेत.