वारंवार तक्रार करून सुद्धा रायगड जिल्ह्यातील मटके व जूगार यांच्यासारखे अवैद्य धंदे सुरूच

ॲड  काशिनाथ जगन्नाथ ठाकूर 15 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालय मुंबईचे परिसरात आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी....


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

ऍड.काशिनाथ जगन्नाथ ठाकूर यांचे अर्ज विषय: वारंवार तक्रार करून सुद्धा रायगड जिल्ह्यातील मटके व जूगार यांच्यासारखे अवैद्य धंदे सुरूच असल्याने दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी काशिनाथ ठाकूर मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन करणार असल्याबाबत.....

महोदय मी ऍड. काशिनाथ जगन्नाथ ठाकूर एक सामाजिक कार्यकर्ता रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मटके व जुगार अशा अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रारी करीत असतो. सदर धंद्यांबाबत ठिकाण व पुरावे देखील रायगड पोलिस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व उपा विभागीय पोलिस अधिकारी व इतर सर्व प्रशासकीय अधिकारी यांना दिले आहेत.  परंतु सदर अवैध धंद्यांवर कारवाई होण्याऐवजी हे धंदे अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहेत. व अशा धंद्यांचे व्यसन अनेक नागरिकांना लागल्यामुळे त्यांची कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहेत.

तरी सदर अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास मी ऍड काशिनाथ जगन्नाथ ठाकूर 15 ऑगस्ट 2023 रोजी मंत्रालय मुंबई चे परिसरात आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी....

Post a Comment

Previous Post Next Post