प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
स्वतः पुढाकार घेऊन पंचायत समितीचे सदस्य जगदीशदादा पवार यांनी त्यांची स्वत:ची जेसीबी च्या साह्याने खड्डेमय रस्ते खडी व माती टाकून बुजविण्याचे मोलाचे काम केले आहे
कोन-सावळे रस्त्यावर पडलेले वावेघर येथील खड्डेमय रस्ते स्व-खर्चाने बुजवण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाचे गुळसुंदे विभागातील नेते आणि पनवेल पंचायत समितीचे सदस्य जगदीशदादा पवार यांनी केले त्यांची स्वत:ची जेसीबी व खडी व माती टाकून रस्ते येणाऱ्या रक्षाबंधाच्या सणाच्या निमित्ताने एखाद्या भाऊ बहिणीला अपघाताला कारणीभूत ठरू नये म्हणून एका भावाने पुढाकार घेऊन रस्ते चकाचक करण्याचे काम केले आहे.
जगदीशदादा पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल रसायनी पंचक्रोशीतील वाहन चालकांना, विद्यार्थ्यांना कामगारांना, रिक्षचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते चंदर माने, युवा नेते सुहास माळी पुरोगामी युवक संघटनेचे रसायनी विभागाचे अध्यक्ष भास्कर गाताडे, निष्ठावान युवा नेतृत्व मधुकर तांडेल, सावळे गावचे युवक अध्यक्ष चेतन म्हात्रे, युवक उपाध्यक्ष मदन मते तसेच वावेघर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.💐🤝*