खालापुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक २६९ / २०२३ भादवि ३०६, ३४ गुन्हयाच्या तपासाबाबत....



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

खालापुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक २६९ / २०२३ भादवि ३०६, ३४ गुन्हयाच्या तपासाबाबत....

१. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने ECL फायनांन्स कंपनी / एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकिय संचालक यांना नोटीस देवून विविध मुद्यांवर माहिती मागविण्यात आलेली आहे. सदर माहिती दिनांक ०८/०८/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत खालापुर पोलीस ठाणे येथे समक्ष हजर राहून सादर करण्याबाबत नोटीसव्दारे समज देण्यात आलेली आहे.

२. एन.डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकाउंटन्ट यांचेकडुन सदर कर्ज प्रकरणाबाबत तपासिक अधिकारी हे अधिकची माहिती घेत आहेत.

३. गुन्हयाचे अनुषंगाने अद्यापपावेतो १५ साक्षीदारांकडे विचारपुस करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत.

४. सदर गुन्हयाच्या तपासाकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मदतीला ०१ पोलीस निरीक्षक, ०३ सहा. पोलीस निरीक्षक व ०४ पोलीस अंमलदार हे तपास करत आहेत.


जन संपर्क अधिकारी : 

पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड-अलिबाग

Post a Comment

Previous Post Next Post