प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहर काँग्रेस भवन येथे येणाऱ्या २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष व पुणे लोकसभा मतदार संघाच्या निरीक्षक मा. आ. प्रणितीताई शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व पुणे लोकसभा मतदार संघाच्या समन्वयक मा.चारुलता ताई टोकस या दोन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, भवन येथे आढावा बैठक पार पडली.
पुणे लोकसभा निवडणुकी संदर्भात बैठकीचे हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मतदार संघातील कार्यकर्ते, १२ ब्लॉक अध्यक्ष यांनी कसे संघटन करणे जरुरी आहे ते सांगितले. कार्यकर्त्यांनी नेत्यांकडून पक्ष संघटनेच्या दृष्टीने काय काय अपेक्षित आहे अशी मते मांडली.
प्रत्येक मतदार संघातून कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी २०१४ ते २०१९ पर्यंतचा लेखा जोखा दिला त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघातून रवी धंगेकर यांची विजयश्री कशी खेचून आणली ते ही सांगितले. तसेच यावेळी अगदी ग्रास रूट कार्यकर्त्यांनी आपले मनोगत मा.आ. प्रणितीताई शिंदे आणि मा. चारूलता ताई टोकस यांच्या समोर मांडले.
त्यांनतर समन्वयक मा. चारूलता ताई टोकास ह्यांनी मार्गदर्शन केले. आणि शेवटी निरीक्षक मा. आ. प्रणितीताई शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे शहर NSUI चे अध्यक्ष अभिजीत गोरे यांनी मा. आ. प्रणितीताई, मा. चारूलता टोकस आणि शहराध्यक्ष मा. अरविंद शिंदे यांच्या हस्ते कु. दिगंता ओव्हाळ, कु. गौरी काळे यांना पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड केल्याची नियुक्ती पत्रे देण्यात आली.
यावेळी माजी आमदार अनंत गाडगीळ, आमदार रविंद्र धंगेकर, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, नीता रजपूत, विजय खळदकर, सोनाली मारणे, उस्मान तांबोळी, सुनिल शिंदे, सुजित यादव, आशितोष शिंदे, रमेश सकट, संतोष पाटोळे, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, आसिफ शेख, अजित जाधव, विशाल जाधव, अय्याज खान, सिमा महाडिक, सीमा सावंत, प्रियंका रणपिसे, सुदंरा ओव्हाळ, शारदा वीर, छाया जाधव, योगिता सुराणा, शिवानी माने, ज्योती चंदवेल आदी सह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.