अन्यथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर या आठवड्यात धरणे आंदोलन करणार...आमदार रवींद्र धंगेकर



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे :  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा जोरदार आरोप कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा  प्रकार झाला असून, निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, हा निधी परत द्यावा  अन्यथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर या आठवड्यात धरणे आंदोलन करणार असून, ते दिसतील तेथे निदर्शने करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला आहे 

तआमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या  आरोपांवर उत्तर देताना हेमंत रासने म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना समान न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. कोणावरही अन्याय करण्याची त्यांची भूमिका नसते. जिल्हा नियोजन मधून सन २०२२-२३ मध्ये लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे निधीचे वाटप झाले आहे. त्यामुळे अपूऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणे  चुकीचे आहे.

 आमदार रवींद्र धनगेकर यांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. जिल्हा नियोजन आणि महापालिकेच्या माध्यमातून नगरविकासकडून करण्यात येणाऱ्या कामांचा कोणताही संबंध नाही . कसबा मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील बहुतांश कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून महानगरपालिका करते. दिवंगत आमदार मुक्ताताई यांनी आपल्या कार्यकाळात जी कामे दिली होती. त्या कामाचा निधी मंजूर झाला होता. त्यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत रविंद्र धनगेकर निवडून आल्यानंतर त्यांनीही त्यांचीच कामे आपल्या नावाने दाखवून श्रेय लाटण्याचा प्रकार धनगेकर करत आहेत, असा जोरदार टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे . 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यात बैठक घेतली आणि जवळपास सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ही तक्रार त्यांच्याकडे का नाही केली, असे विचारले असता आमदार धंगेकर म्हणाले, “अजितदादा इनोसंट आहेत. त्यांना यातले काहीच माहिती नाही. त्यांचा विकासाला कधीच विरोध नसतो. हे कारस्थान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच केले आहे.’

Post a Comment

Previous Post Next Post