प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वर अली शेख
पुणे शिरूर ; बुधवार दि. 05 सप्टेंबर 2023 रोजी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर भारतीय बहुजन पालक संघ आणि बहुजन मुक्ती पार्टी शेकडो विद्यार्थी आणि पालकांना बरोबर घेऊन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात अर्धनग्न ठिय्या आंदोलन करणार आहे.
शिरूर गटातील दहा खाजगी शाळांची 12 ख नुसार झालेल्या चौकशी चे अहवाल तत्काळ जाहीर करून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे, नामांकित खाजगी शाळांकडून बेकायदेशीर फी आकारली जाते, फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, विद्यार्थ्यांचे निकालपत्र अडवून ठेवली जातात तसेच विविध शासन आदेशांची पायमल्ली करून त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे अनेक तक्रारी संघटनेने पुराव्यासह केल्या आहेत परंतु शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कारवाई करण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करतायत, पाठपुरावा करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जात आहे दोषी शाळा आणि संस्थाचालकांना वाचवण्यासाठी प्रकरण प्रलंबित ठेवून चौकशी अहवाल दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आह, वारंवार मागणी करूनही चौकशी अहवाल जाहीर करत नाही त्यामुळे व्यथित होऊन भारतीय बहुजन पालक संघ आणि बहुजन मुक्ती पार्टी ने अर्धनग्न ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.