'ग्रीन ऍक्टिव्हिटी रूम' उपक्रमाचे उद्घाटन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे : हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्रायमरी स्कूल (भवानी पेठ) मधील 'ग्रीन ऍक्टिव्हिटी रूम' या पर्यावरण विषयक शैक्षणिक प्रशिक्षण सुविधा आणि उपक्रमाचे उद्घाटन डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक सुविधा,प्रदर्शन,उपक्रम या ठिकाणी असणार आहे.पर्यावरण संरक्षण,शाश्वत ऊर्जा, रिसायकलिंग,जैवविविधता विषयक माहिती दिली जाणार आहे.यावेळी एस.ए.इनामदार, एस.बी.एच.इनामदार,बुद्रुद्दीन शेख आणि मुख्याध्यापक झाहीदा इनामदार उपस्थित होत्या.या उपक्रमाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशनदेखील करण्यात आले. 



Post a Comment

Previous Post Next Post