प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणारे कर्मचारी नेवासे यांची हकालपट्टी केली असून यापुढे विद्यार्थ्यांची लूट करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
विद्यापिठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करतात. याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला होता. प्रथम भंडारी या विद्यार्थ्याकडून कर्मचारी नेवासे यांनी पैसे घेतले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या तक्रारीअन्वये कर्मचार्याला निलंबित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी केलेले आरोप
१. कोणत्याही कागदपत्रासाठी संबंधित विभागाकडे गेले असता विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.
२. विद्यार्थ्यांना कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागत असल्याने विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ वाया जातो.
३. विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करून त्यांना मानसिक त्रास दिला जातो.