प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मोदी आडनाव प्रकरणी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर ‘‘ये नफरत के खिलाफ मोहब्बद की जीत है’’ अशी पोस्ट काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली.
काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी यांना सुरत न्यायालयाने दिलेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने मा. राहुलजी गांधी यांना खासदार म्हणून लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घटनेचा आनंद व्यक्त करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे ‘आनंदोत्सव’ करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना साखर व पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी ‘देश की आंधी राहुल गांधी’ या घोषणेने काँग्रेस भवन दुमदुमूले.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणाले की, ‘‘विरोधकांना संपविण्यासाठी भाजपाने जी हुकूमशाही चालविली आहे त्याला आज मा. सुप्रिम कोर्टाने चाप लावला आहे. संसदेमध्ये अदानी, अंबानी यांच्या विरोधात आवाज उठवू नये म्हणून सुडबुध्दीने केलेली कारवाई मा. सुप्रिम कोर्टाने आज हानून पाडली त्याबद्दल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही मा. सुप्रिम कोर्टाचे आभार मानतो.’’
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, मुख्तार शेख, अजीत दरेकर, लता राजगुरू, संगीता तिवारी, सुनिल शिंदे, मेहबुब नदाफ, सुधीर काळे, प्रकाश पवार, राहुल शिरसाट, राजाभाऊ कदम, अजित जाधव, बळिराम डोळे, विशाल जाधव, अशोक जैन, रवि आरडे, विशाल गुंड, गुलामहुसेन खान, सिमा महाडिक, रेखा गेलोत, अनुसया गायकवाड, सुंदरा ओव्हाळ, संजय डोंगरे, इम्रान शेख, आशिष जाधवराव, अक्षय जैन, फैय्याज शेख, नितीन परतानी, मनिषा ओव्हाळ, सुनिता खरात, परवेज तांबोळी, बाबा सय्यद, सचिन बहिरट, युवराज मदगे, विजय जगताप, ॲन्थोनी आय, अजित थेरे, गौतम जाधव आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.