पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र , पुणे जिल्हा अध्यक्षपदी राजेखान शौकत पटेल यांची निवड

   संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी निवड  जाहीर  केली  .........

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे  : दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर यांच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सिद्धार्थ सरवदे, उपाध्यक्ष बाळासाहेब सुतार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे व कार्याध्यक्ष किशोर ओहळ ,पुणे  व सोलापूर जिल्हा पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये नूतन पुणे जिल्हा अध्यक्ष राजेखान शौकत पटेल यांची निवड जाहीर करण्यात आली . 

 राजेखान पटेल  यांनी पत्रकार म्हणून दैनिक सकाळ, जनलोक वार्ता , मुहमेंट एक्सप्रेस  सोशल फायटर , टीव्ही 9 अश्या प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये पत्रकार म्हणून कार्य मोठ्या प्रमाणात केलेले आहे . सध्या अल्फाज टाइम्स साप्ताहिक व अल्फाज युट्युब पोर्टल प्रिंट व डिजिटल मीडियाचे संपादक मालक म्हणून कार्यरत  आहेत व मानवाधिकार महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अल्फाज टीम मधील पत्रकार बांधव , पुणे सोलापूर जिल्हा, गुजरात राज्यातील बांधवांनी या निवडीबद्दल हार्दिक  शुभेच्छांचा वर्षाव करून आनंद व्यक्त केला आहे . पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी दिलेले जबाबदारी पराकष्टाने सर्व पत्रकार बांधवांच्या हितासाठी लोककल्याणासाठी याचा निश्चित उपयोग करण्याचा प्रयत्न करील हा आशावाद मांडला.  सर्वांनी यांच्या पुढील कार्यास व वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post