प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :मर्यादेपेक्षा जास्त परकीय चलन बागळणाऱ्या चौघांवर पुणे विमानतळावर कस्टम (सीमा शुक्ल विभागाने) मोठी कारवाई केली कारवाई करत त्यांच्या कडून तब्बल दीड कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई शुक्रवारी संध्याकाळी करण्यात आली.
या बाबत कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार प्रवाशी हे पुणे विमानतळावर संशयित रित्या फिरतांना कस्टमच्या अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी त्यातील एकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ तब्बल ९ लाख २२ हजार रुपयांचे दिरहम आढळले. पोलिसांनी ते जप्त केले. त्यानंतर कस्टमच्या पथकाने आणखी एक कारवाई केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक कोटी ४१ लाख ११ हजार ७२८ रुपये किंमतीचे दिरहम जप्त करण्यात आले. चौघा प्रवाशांनी मर्यादेपेक्षा जास्त परकीय चलन बाळगल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणाचा कस्टमकडून तपास करण्यात येत आहे.