प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे - अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात लोकसभा मतदार संघनिहाय्य ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रदेश कॉँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांची तेलंगणातील पेडापल्ले लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे पत्र कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन) खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी पाठविले आहे.
मोहन जोशी यांनी कॉँग्रेस पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर काम केले असून आतापर्यंत 12 राज्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कामांसाठी प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.