पुणे शहरातील रस्ताच्या 2500 कोटीच्या टेंडरमधील भ्रष्टाचारा विरोधात शिवसेनेचे शनिपार चौकात आंदोलन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्याच्या रस्त्यानी आणि खड्डयांनी पुणेकरांच्या मागचा सहा वर्षे पाठलाग सोडला नाही. त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे , या सहावर्षात पाच वर्षे भाजपचे पुण्यात 96 नगरसेवक, 6 आमदार, 1 खासदार असूनही फक्त टेंडर आणि टक्केवारी यामुळे पुणेकरांचे हाल झाले आणि 2500 कोटी रुपये खर्च होऊनही नशिबी खड्डेच आले या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुणे शहरात आंदोलन करण्यात आले .
यावेळी शिवसैनिकांनी प्रशासन , आयुक्त आणि भाजप याविरोधात घोषणा दिल्या तसेच 2500 कोटी पुणेकरांचे खड्ड्यात खर्च झाले त्याचा हिशोब व्हावा ह्यासाठी पुन्हा एकदा CBI चौकशीची मागणी केली , यावेळी घोषणा देताना
" डांबर खडी चा मेळ .. भाजप आणि प्रशासनाचा खेळ"
"ED बाई ED... तिला पुण्यातला खड्ड्यांचा भ्रष्टाचार दिसत का नाही' ? अश्या घोषणा दिल्या .
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले पुणे महानगरपालिका रस्ते का दुरुस्त करत आहे ? तर फसलेली 24 ×7 पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज देखभाल दुरुस्तीची कामे, क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विकास कामे करताना होणारी खोदाई, रिलायन्स कंपनीची केबल टाकणे, पावसाळी गटाराची कामे अशी अनेक स्वरूपाची नियोजन नसलेली कामे केल्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. परंतु या कामाच्या दर्जाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. काम करताना खोदाई केलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला इस्टिमेट मध्ये नियोजन केलेले असते व सदर ठेकेदार सदर कामाचे बिल वसूल करत असताना जर त्याने केलेल्या कामामुळे खड्डे पडले असतील तर डिफेक्ट लायब्लिटी कालावधी मध्ये त्याच ठेकेदारांनी पुन्हा रस्ता पूर्ववत करणे आवश्यक आहे. महानगरपालिका ठेकेदारावर आर्थिक भार पडू नये आणि सर्वांना मलिदा खाता यावा म्हणून पुन्हा त्याच ठेकेदाराला पैसे पुरवून खड्डे भरण्याचे काम दिले जाते. सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशातून ठेकेदारांनी केलेला कामचुकारपणा लपवण्याचे काम होत आहे. एकाच कामावर वारंवार खर्च करून मनपा पुणेकरांना आर्थिक खड्ड्यात घालण्याचे काम करत आहे. तसेच मर्जीतील ठेकेदारालाच काम देण्याची व्यवस्था केली जाते व दुसऱ्याच्या मर्जीतील ठेकेदाराने टेंडर भरले तर कादपत्रात काहीतरी उणीवा काढून त्याला अपात्र केले जाते. हा सर्व 2600 कोटीचा भ्रष्टाचार उघड झालाच पाहिजे. सीबीआय मार्फत चौकशी झालीच पाहिजे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी राजीनामा दिलाच पाहिजे. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि पुण्यातील मतदार या निवडणुकीत भाजपला खड्डा नक्की दाखविणार असे म्हणाले .
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे , उपशहरप्रमुख बाळासाहेब ओसवाल, समीर तुपे, भरत कुंभारकर, बाळासाहेब मालुसरे , संजय भोसले, प्रशांत राणे , तानाजी लोणकर, अशोक हरणावळ, राजेंद्र बाबर, राजाभाऊ होले, उत्तम भुजबळ, अजय परदेशी, अतुल गोंदकर, विजय नायर महिला शहर संघटिका पल्लवी जावळे , संगीता ठोसर , सविता मते , कल्पना थोरवे , शहर संघटक किशोर राजपूत , राजेंद्र शिंदे, अनंत घरत, नंदू येवले , मुकुंद चव्हाण, नागेश खडके, विश्वास चव्हाण, शेखर जावळे, गोविंद निंबाळकर, अमर मारटकर, संतोष भूतकर , नितीन दलभंजन विकी धोत्रे, संजय वाल्हेकर, अरविंद दाभोलकर, दिलीप पोमन, रुपेश पवार, अमोल दांगट, प्रसाद काकडे, रवी भोसले, राजेश मांढरे, निखिल जाधव , अजय भुवड, संजय लाहोट, राहुल शेडगे, प्रतीक गलींदे , नागेश खडके, हर्षद ठाकर, विलास नावडकर, परेश खांडके, सूरज मोराळे, निकिता मारटकर, करुणा घाडगे, अमृता पठारे, वैशाली दारवटकर, रोहीणी कोल्हाळ, पल्लवी नागपुरे, रेखा कोंडे, सुनीता खंडाळकर, सविता गोसावी, योगिता शिर्के, गौरी चव्हाण, सुलभा तळेकर, सरोज कार्वेकर, गायत्री गरुड, मिनाक्षी रावळ, स्वाती ठकार, इतर शिवसैनिक उपस्थित होते .