प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहर अध्यक्ष पदी समीर मोहिद्दीन शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली. सदरील निवड अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी यांच्या आदेशाने महाराष्ट्राचे प्रभारी मोहंमद अहमद खान यांनी केली आहे. समीर शेख यांनी पुणे शहरातील वडगांवशेरी विधानसभा अध्यक्षपदी ८ वर्षे काम केले आहे. दि मुस्लीम कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी ते कार्यरत असून युनीवर्सल अमन फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मा. वजाहत मिर्झा, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष मा. अरविंद शिंदे यांनी समीर शेख यांचे अभिनंदन केले आहे.
Tags
पुणे