प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीण-भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंजली काळे (14 वर्षे) आणि तिचा छोटा भाऊ दिगू काळे (12 वर्षे) असे मृत झालेल्यांची नावे आहेत.
पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गंगापूर गावा मध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालया मध्ये पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मुलं गमावल्यामुळे काळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणाचा तपास घोडेगाव पोलिसांकडून सुरु आहे.