भारतीय जनता पार्टी दापोडी वतीने हर घर तिरंगा अभियान यशस्वी संपन्न.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अन्वर अली शेख : 

दापोडी नरवीर तानाजी चौक परिसरामध्ये व्यापारी व्यावसायिक, बांधकाम मजूर ,रिक्षा चालक, चहा ,पेपर व पुष्पविक्रेता तसेच नरवीर तानाजी व्यायाम मंडळ पदाधिकारी यांना तिरंगा ध्वज महाराष्ट्र विधान परिषद आमदार उमाताई खापरे, मा. खासदार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमरजी साबळे, पिं.चिं.नव विकास प्राधिकरण अध्यक्ष प्रदेश सदस्य सदाशिव खाडे सर यांच्या हस्ते देण्यात आले....!!!  तिरंगा ध्वज वाटप व यात्रा होत असताना नागरिकांमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले

 यावेळी  नगरसेवक माऊलीभाऊ थोरात, युवा नेते संजयभाऊ मंगोडेकर,भाजपा जिल्हा सचिव विशाल वाळुंजकर ,भाजपा उपाध्यक्ष प्रकाश तात्या जवळकर,युवा नेते सागर फुगे, दापोडी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत मोरे, प्रदिपदादा वाळूंजकर फाउंडेशन अध्यक्ष लक्ष्मणभाऊ दरेकर, भाजपा दापोडी पिंपरी मंडळ सरचिटणीस विशाल सातपुते, भाजपा प्रभाग क्रमांक 30 अध्यक्ष घनश्याम सकट, महिला आघाडी जिल्हा सदस्य जयश्रीताई नवगिरे ,वंदनाताई वाघमारे, भाजपा अल्पसंख्यांक आघाडी अमीरभाई शेख, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष सुभाष सिंगल, भाजपा युवा नेते व शक्ती केंद्रप्रमुख नितीन भाऊ जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ वाळुंजकर, कामगार नेते मधुकर शिंदे, राजूभाऊ कांबळे पोपट सुतार, भावड्या सोनवणे, युवराज वाळुंजकर, अक्षय वाळुंजकर अधिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...!!!

कार्यक्रमाचे मुख्य संयोजन भाजपा जिल्हा सचिव विशाल वाळुंजकर यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post