प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे : परभणी जिल्हा प्रतिनिधी .
सेलू : सेलू हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे व त्यांचे मित्र मंडळ नेहमीच परंपरेला अनुसरून महोत्सवाचे आयोजन करत असतात.त्याचाच एक भाग म्हणून सेलू शहरातील महिला व मुलांसाठी नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे हे अकरावे वर्ष होते.विनोद बोराडे व त्यांचे मित्र मंडळ दिनांक 21 ऑगस्ट 2023 सोमवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 8 असे या महोत्सवाची वेळ ठेवण्यात आली होती. यादरम्यान नागदेवता चे पूजनाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. महोत्सवातील विविध स्पर्धा संगीत खुर्ची, उखाणे, दोरीवरच्या उड्या, प्रश्नमंजुषा, फुगडी इत्यादी पारंपारिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर महिला व लहान मुलांसाठी रात पाळणे व विविध मनोरंजकाचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि या स्पर्धेतील प्रत्येक तीन विजेत्यांना आकर्षक बक्षीस ही ठेवण्यात आले होते.
दरवर्षी घेण्यात येणाऱ्या अशा आगळ्यावेगळ्या महोत्सवाचा सेलू शहरातील सर्व महिला व बंधू-भगिनींनी व लहान मुलांनी खूप आनंद लुटला. त्याचबरोबर दहा वर्षाच्या आतील लहान मुलांसाठी वेगळे विशेष आकर्षण असे ठेवण्यात आले होते. सेलू येथील हुतात्मा स्मारक येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर या महोत्सवामध्ये नरेंद्र राठोड प्रस्तुत सप्तसूर या गीत संगीताचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला प्रस्तुत ऑर्केस्ट्रा च्या संगीतावर मुली व महिलांनी चांगलाच ठेका धरला होता. या कार्यक्रमात केवळ महिला व मुलींना प्रवेश होता. अशा वेगवेगळ्या महोत्सवाचा आनंद सर्व सेलूतील घरातील महिला व मुलींनी घेतला.