प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे : प्रतिनिधी : परभणी.
परभणी : दि . 23 पीक विमा योजनेतील तरतूदी प्रमाणे जिल्ह्यातील शेतकर्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळेच होत असलेल्या पीक नुकसानीबद्दल अग्रीम पीक विमा भरपाई अदा करावी आणि जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या संतप्त पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार रास्तारोको आंदोलन केले.
बाळासाहेब रेंगे, राजन क्षीरसागर, पंढरीनाथ घुले, प्रदीप सोनटक्के, अजय चव्हाण, अमोल जाधव, प्रसाद गोरे, शिवाजी कदम, उमेश मिरखेलकर, कैलास टेकाळे, परमेश्वर यादव, रामदास दळवे, अॅड. शेख अब्दुल, रामराव दळवे, जनार्धन सोनवणे, मनिष यादव, सोनाली देशमुख, आश्रोबा लोखंडे, बालासाहेब मस्के, नरहरी ढगे, गोविंद मुंडे, रामभाऊ सुक्रे, वामन दळवे,सुधाकर चव्हाण, वैभव गाडगे, गणेश काळदाते, कैलास टेकाळे, ज्ञानेश्वर पौंढे, शिवाजी कदम, सतीश रेंगे, मधुकर काळदाते आदीं संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून, प्रचंड घोषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण जिल्ह्यात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. विमा कंपन्यांच्या तरतूदीप्रमाणे अग्रीम पीकविमा भरपाई मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना निर्देश दिले पाहिजेत, असे स्पष्ट करीत या आंदोलन- कर्त्यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनातून आठ मागण्या सादर केल्या आहेत. त्यात पिकविम्यासह पिककर्जाचे पुनर्गंठण, सिंचन प्रकल्पातून पाणी पुरवठा, कांदा उत्पादकांना अनुदान वाटप, तसेच मौजे बाभळगाव येथील नियोजित कचरा डेपो हलविण्याचाही मुद्दा उपस्थित केला.