प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी परभणी.
वालूर : दि.30 ऑगस्ट बुधवार रोजी सेलू तालुक्यातील वालूर येथील एम आय एम पक्षाच्या वतीने खासदार इम्तियाज जलील औरंगाबाद यांच्या निवासस्थानी भेट देऊन आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली
तसेच वालूर एम आय एम पक्षा तर्फ पुर्ण ताकतीने येणा-या ग्रामपंचायत पंचायत निवडणुकीत 17 जागा लढविण्याची तयारी दर्शविली. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांना याबाबत माहिती देऊन पुष्गुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी एम आय एम पक्षाचे वालुर शहराध्यक्ष जावेद कुरेशी, उपाध्यक्ष जफर कुरेशी,सहसचिव रहिमखॉ पठाण, शाखा अध्यक्ष युसुफ काजी,नदीम भाई जमिदार, संदीप राऊत, इमरान अन्सारी, अजजू पठाण, शरद सोनवने, इंजमाम कुरेशी सह एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.