प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे: जिल्हा प्रतिनिधी : परभणी.
गंगाखेड: दि.23 चांद्रयान ३ अभियानाच्या यशस्वीतेकरीता गंगाखेडात बुधवारी पुजा व प्रार्थना करण्यात आली. प्रसिध्द कलाकार विश्वनाथ कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, साई सेवा प्रतिष्ठानचे सचिव नागेश पैठणकर, लायन्स क्लब गोल्ड सिटीचे अध्यक्ष श्रीधर जोशी, आर.डी. भोसले, लक्ष्मीकांत खळीकर, प्रकाश घन यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी विश्वनाथ कांबळे यांनी साकारलेल्या चांद्रयानाच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नागरीकांनी या प्रतिकृतीसोबत मोठी गर्दी करीत सेल्फी घेतली.सुमीत कांबळे, अमीत कांबळे, प्रकाश कुलकर्णी, अभिजित पुर्णाळे, रत्नाकर कुलकर्णी, सोपान वाकळे, भोकरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता परिश्रम घेतले.