प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ.शिवाजी शिंदे : परभणी.
परभणी: जुन्या जिल्हा परिषद इमारत परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नव्या जि. प. इमारत परिसरात स्थलांतर व्हावे या मागणीसाठी आज शिवप्रेमींनी मोठा मोर्चा काढला होता.या मोर्चाचे नेतृत्व काॅंग्रेस नेते बाळासाहेब रेंगे पाटील यांनी केले.
मोर्चेकरांनी जि. प. प्रशासनाला निवेदन दिले असता, त्यांची मागणी मान्य करण्यात आली. मोर्चेकरांनी यावेळी उल्हासात आज शेकडो भगवे ध्वज फडकाविले. शहरातील जिंतूर रस्त्यावर असलेल्या जुन्या जिल्हा परिषद इमारतीतून वर्षभरा- -पूर्वीच परभणी जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे कार्यालय प्रियदर्शनी स्टेडियम परिसरात उभारलेल्या मोठ्या जि.प.इमारतीत स्थलांतरित झाले आहे मात्र यावेळी जुन्या इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा हलवण्यात आला नाही. जुन्या इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने यापूर्वीच दिले असल्याने या ठिकाणाहून जिल्हा परिषद चे सर्व कार्यालय स्थलांतरित झाले. लवकरच ती इमारतही जमीनदोस्त करण्याचेही संकेत असल्याचे बाळासाहेब रेंगे यांनी मोर्चा दरम्यान बोलताना सांगितले.
हा मोर्चा पोलीस अधिक्षक कार्यालय जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून नवीन जिल्हा परिषद इमारतीपर्यंत गेला यात शेकडो शिवप्रेमींचा सहभाग होता. मोर्चेकर्यांनी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मून यांच्याकडे निवेदन सादर केले.सीईओ ने मोर्च्याकरर्यांची मागणी मान्य करून लवकरच जुन्या इमारतीतील अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन जि प इमारती परिसरात स्थलांतरीत करण्यात येईल असे आश्वासन मोर्चेकरी यांना दिले. त्यानंतर हा मोर्चा विसर्जित करण्यात आला.