प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ.शिवाजी शिंदे : परभणी.
पुणे : 20 ऑगस्ट रविवार रोजी पुणे येथील अजिम कॅम्पस मध्ये प्रेस मीडिया लाईव्ह पुणे यांच्या वतीने डॉ.शिवाजी शिंदे यांचा राष्ट्रीय आदर्श ग्रंथापाल म्हणून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र कॉस्मो- पॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष,तथा अजीम युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार,जेष्ठ विचारवंत,गांधी विचार श्रेणीचे समाजिक कार्यकर्ते श्री.कुमार सप्तर्शी,आमदार मोहनदादा जोशी,अमेदाबी इनामदार, डॉ.कुरेशी, डॉ.आरिफ मोमिन, अरविंद शिंदे,संजय मोरे,ऑड.आयुब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेस मीडिया लाईव्ह चे अध्यक्ष मेहबूब सर्जेखान यांनी प्रस्ताविक सादर केले. प्रास्ताविकात त्यांनी प्रेस मीडिया च्या वतीने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती सादर केली. सांस्कृतीक व समाजिक,शैक्षणिक,क्रीडा,राजकीय, अश्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक मान्यरांना पुरस्कार देण्याचे कार्य मागील 3 वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. प्रेस मीडिया च्या माध्यमातून तळागाळातील अनेकांना पुढे आणण्याचा प्रयत्न सातात्याने केला जातो.मराठवाड्यातील सेलू सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये पालकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी म्हणून डॉ.शिवाजी शिंदे यांनी केलेले कार्य निश्चितपणे कौतुकास्पद आहेच त्यामुळे त्यांना राष्ट्रीय आदर्श ग्रंथपाल जीवन गौरव पुरस्काराने प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ.पी.ए.इनामदार,अमेदाबी इनामदार,जेष्ठ विचारवंत,डॉ.कुमार सप्तहर्षी, माजी आमदार मोहनदादा जोशी व विचारमंचावरील सर्व मान्यवर, प्रेस मीडिया लाईव्ह चे अध्यक्ष मेहबुब सर्जेखान आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे डॉ.कुमार सप्तहर्षी आपल्या भाषणात म्हणाले की,भारत हा देश सर्वसमावेशक देश आहे. या देशामध्ये अनेक जाती- धर्माचे विविध पंथाचे लोक एकत्र राहतात. आज मात्र देशातील राजकारण असो किंवा समाजिक असो,माणसा - माणसात कटुता कशी निर्माण करता येईल याकडे काही लोक प्रयत्न करतांना दिसून येत आहे.अश्या परिस्थिती प्रेस मीडियाचे अध्यक्ष मेहबूब सर्जेखान यांनी विविध क्षेत्रात उत्कुर्ष्ट कार्य करणाऱ्यां विविध जाती धर्माच्या लोकांना आपल्या मीडिया च्या वतीने पुरस्कार देऊन एकात्मेचे दर्शन घडून आणले.आज येणारी निवडणूक आम्हा सर्वांची शेवटची निवडणूक असेल.भविष्यात जर एकात्मकता टिकून ठेवायची असेल तर सर्वांनी जात,पंथ,धर्म बाजूला ठेवून एकसंघ भारत कसा राहील याची दक्षता घेणे गरजे आहे. कार्यक्रमाचे पाहुणे डॉ.पी.ए.इनामदार आपल्या भाषणात म्हणाले की,मी कधी ही माझ्या आयुष्यात जाती भेद पाळला नाही सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन संस्थेचा विकास केला.आज माझ्या संस्थेत 27 हजार विद्यार्थी वेग वेगळ्या विभागात शिक्षण घेत आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृती साठी सुप्रिम कोर्टा पर्यंत लढा देऊन त्यांना न्याय मिळून दिला.मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी अहोरात्र श्रम केले.त्यात माझ्या पत्नी आमेदाबी इनामदार यांनी खांद्याला खांदा लाऊन सहकार्य केले. वाचन क्षेत्रात डॉ.शिवाजी शिंदे यांनी केलेले कार्य आजच्या युवकांना निश्चितपणे प्रेरणा देणारे आहे.त्यांनी वाचन संस्कृती वाढवी म्हणून जे काही उपक्रम राबविले आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहेच.त्यातून आज विध्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून निश्चित शैक्षणिक धोरन आखणे गरजेचे आहे.शेवटी अध्यक्षीय समारोप मा.आमदार मोहन दादा जोशी केला.कार्यक्रमाचे आभार महेबूब सर्जेखान यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस मीडियाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील पुरस्कार कर्ते, अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.