प्रेस मीडिया लाईव्ह :
शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी : परभणी.
सेलू: डॉ.झाकीर हुसेन प्राथमिक शाळा, सेलू येथे मिशन UPSC अंतर्गत बैठकीचे आयोजन सोमवार 21 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.या बैठकीत परभणी येथील समन्वयक मोहम्मद युनूस अन्सारी व शिक्षण तज्ञ मोहम्मद मुनीर यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात मुफ्ती यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. मुनीर सरांनी मिशन यूपीएससीच्या मागील अनुभवांची माहिती दिली.त्यानंतर मुहम्मद युनूस अन्सारी यांनी पुढील टप्पे समजावून सांगितले.सातवी,नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया कशी होते हे सांगितले.परभणी शहराच्या मागील यशाचा उल्लेख करून ते म्हणाले. दोनशे बहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले असे सांगितले.यूपीएससी सुरू झाल्याची घोषणा केली.
या बैठकीत सर्व उपस्थितांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत एक समिती स्थापन करण्यात आली ज्यामध्ये डॉ.झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलूचे मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी सर यांची एकमताने समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. समितीमध्ये मोहम्मद इरफान मुख्याध्यापक शैलजा उर्दू शाळा, मोहसीन अन्सारी मुख्याध्यापक खान अब्दुल गफ्फार खान उर्दू शाळा, पठाण जावेद खान मुख्याध्यापक यासेर उर्दू प्राथमिक शाळा ,सय्यद समीर हाश्मी मुख्याध्यापक डॉ झाकीर हुसेन माध्यमिक शाळा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. सर्वांनी आप आपल्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीत झकी अहेमद सिद्दीकी सर, पत्रकार अबरार बेग,हाफिज मुहम्मद जुनैद साहब, मोहम्मद रिझवान सर,मुफ्ती मुसेब साहब,शेख असद भाई. टेलर, सय्यद हमीद भाई, सय्यद साबेर यांची उपस्थिती होती.