प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ.शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधि : परभणी.
सेलु : काल आ. सौ. मेघनादीदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने सेलू शहरातील अनेक भागात बंद असलेल्या पथदिव्याच्या निषेधार्थ नगर परिषद सेलूला मेणबत्ती भेट देण्यात आली. तसेच निवेदन देण्यात आले त्यात त्यांनी शास्त्रीनगर, नूतन विद्यालय रोड, शॉपिंग सेंटर, विद्या नगर, पारिजात कॉलनी, नूतन महाविद्यालय रोड, तसेच शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद आहेत.सध्या पावसाचा मौसम चालू आहे त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे व पथदिवे बंद असल्यामुळे रस्त्यातील खड्ड्यात नागरिक पडत आहेत तसेच शिकवणीला जाणारे विद्यार्थी, देवदर्शनाला जाणाऱ्या महिला- पुरुष यांना अंधारामुळे त्रास होत आहे. या बंद पथ दिव्यामुळे अंधाराचा फायदा समाजकंटक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संपूर्ण सेलू शहरातील पथदिवे ताबडतोब सुरू करण्यात यावे. नसता भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने नगरपालिका वर कॅन्डल मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जयसिंग शेळके, बाळू काजळे,नागेश ठाकूर, वणिताताई चाफेकर, शाम चाफेकर, अमर मगर, गोविंद शर्मा, लालू खान, सचिन घोगरे, रेखाताई आवचार, अनिताताई महाजन, मंगलताई मुसळे उपस्थित होते.