प्रेस मध्ये लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्राला लागूनच असलेल्या नवी मुंबई शहर परिसरात डेंगू, मलेरिया सारखे आजार झपाट्याने वाढत आहेत. पावसाळ्याचे दिवस आणि त्यात सततचे हवामान बदल तसेच अनेक होणारी बांधकाम विकासकामे यामुळे पनवेल महानगरपालिका परिसरात डेंगू, मलेरिया व इतर आजारात रुग्णांची वाढ होवू शकते. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने योग्य ती खबरदारी घेवून वैद्यकीयदृष्ट्या उपाययोजना राबविण्यात याव्या. त्याचबरोबर नागरिकांनाही ठीकठिकाणी घ्यावयाची खबरदारी संदर्भात जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी मा.विरोधीपक्ष नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केली आहे.
सध्या पनवेल, कामोठे ,कळंबोली परिसरात पावसामुळे गटारे तुंबून रस्त्यावर सांडपाणी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या सांडपाण्यावर डेंग्यूच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेने व्यवस्थित खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे असे मत नागरिकांकडून सुद्धा व्यक्त होत आहे.
कोट
नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या महापालिकेमध्ये प्रशासन सर्व यंत्रणा सांभाळते.अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच ठिकाणी उणीव जाणवते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या त्रासाबद्दल आपण अगोदरच नियोजन केले तर नक्कीच पनवेल मध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढणार नाही. आयुक्तांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलावी अशा प्रकारे मी मागणी केली आहे आणि पाठपुरावाही त्याचा घेणार आहे.:-