प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे
मिरज शहर स्वागत कमान समिती सर्वं साधारण बैठक आयोजित करण्यात आली यामध्ये सन २०२३ गणेश उत्सव निमित्त मिरज शहर स्वागत कमान समीतीच्या सर्व सदस्य हजर झाले यावेळी मावळते अध्यक्ष श्री.अशोकराव दुर्वे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली तसेच सालाबादप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवड करण्यात आली .
अध्यक्ष पदी श्री.चंद्रकांत मैंगुरे उपाध्यक्ष श्री विजय शिंदे खजिनदार श्री.सोमनाथ गोटखिंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी मिरज शहर स्वागत कमान समितीच्या वतीने हिंदू एकता आंदोलनचे श्री परशुराम चोरगे यांनी प्रास्ताविक केले विविध क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा झाली तर सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे आभार व्यक्त श्री शंकरलाला परदेशी यांनी केला यावेळी उपस्थित मान्यवर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शिंदे, हिंदू एकता आंदोलन परशुराम चोरगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुबेरसिंग रजपूत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री राजू पाटील. वीरशैव लिंगायतचे जयगोंड कोरे धर्मवीर संभाजी महाराजचे सूर्यकांत शेगणे सर्व कमान धारक पदाधिकारी उपस्थित होते