रायगड जिल्ह्यात पाली पोलीस स्टेशन हद्दीत व वडखल पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे मटका चालू

 संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे डोळेझाक


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

85 30 83 87 12

वडखळ हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. व पाली हे देवस्थानचे ठिकाण असून अशा या दोन्ही ठिकाणी वडखळ मटका जुगार

1) बोरेकर मटका

2) गायकर मटका

 3)पाली सुधागड मटका ( काटकर)

 वडखळ येथे राजरोसपणे अवैध मटका सुरु असून याकडे स्थानिक पोलीस यांचे दुर्लक्ष होत आहे. वडखळ शहराचा विकास झपाट्याने होत असून या शहरात मात्र अवैध धंद्याना ऊत आला आहे. पैशाच्या अमिषाला भुलून अनेक गरीब कुटुंब उद्धवस्त होत असून वडखळ पोलिस जामुन बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. काशिनाथ ठाकुर यांनी केले आहे. 



रायगड जिल्हा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ ठाकूर यांनी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. ही लढाई गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध धंद्या विरोधात १५ आगस्ट रोजी मंत्रालयाच्या गेट समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांसाठी अवैध मटका जुगार धंदे बंद करण्यात आले होते. काही दिवस उलटत नाही तोच रायगड जिल्ह्यामध्ये अवैध मटका जुगार धंद्याने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे .पोलीस प्रशासन मात्र अवैध मटका जुगार धंद्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या रायगड अवैध मटका जगार धंद्यानबाबत जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.

याचे जिवंत उदाहरण म्हणजे वडखळ येथे सुरू असलेल्या अवैध मटका जुगार धंदा राजरोसपणे सुरू आहे. अशा अवैध धंद्याविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. कोरोना काळात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली असून काही लोकांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या आहेत. त्यामुळे गावाकडे रोजमदारीवर काम करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु पैशाच्या लोभामुळे बरेच लोक कमीवेळात जास्त पैसा मिळत असल्यामुळे या अवैध धंद्याकडे वळले असून कल्याण, मेन यावर आकडे, पाना लावून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सध्याकाळी मिळणारी मजूरी अधिक पैसे मिळतील. या आशेने मटका खेळून रिजल्टची वाट पाहत असतात. हे मटका खेळणारे हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोक दिवस भर मोलमजुरी करून सध्याकाळी मिळणारी मजूरी अधिक पैसे मिळतील. या आशेने मटका खेळून सांगितले.

पैशाची बरबादी करून कुटुंब उध्दवस्त करीत आहेत. मटका "खेळणा-या काही जणांना कमिवेळात पैसा मिळत असल्यामुळे हा पैसा व्यसनाधिनतेकडे जात आहे त्यामुळे अनेक कुटूंब उध्दवस्त झाली आहेत. यामध्ये मटका चालक दिवसेन दिवस गब्बर होत असून मोलमजूरी करणारे मात्र देशोधडीला लागले असून त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. वडखळ पोलिसांनी अवैध मटका धंद्यावर त्वरित कारवाई करून सर्वसामान्य गरीब जनतेचे कुटुंब वाचवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. काशिनाथ ठाकुर केली आहे. तसेच रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध मटका जुगार धंद्यानबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ ठाकूर यांनी माहिती देताना

Post a Comment

Previous Post Next Post