प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- गर्दीचा फायदा घेत बस मध्ये चढताना चोरी करणारया दोन महिला कडुन दिड तोळ्याची चेन जप्त करून त्यांना अटक केली.नगीना सागर चौगुले (वय 36,)आणि विठाबाई नितीन चौगुले (वय 43,रा.हातकंणगले). अशी आरोपीची नावे आहेत.सदर चोरीचा गुन्हा वडगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे.या गुन्हयाचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषन पोलिसांना या दोघीनी चोरी केलयाची माहिती मिळाली असता आज कोल्हापुरात गुजरी येथे सापळा लावुन या दोघीना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली अ सता चोरीतील दिड तोळ्याची चेन जप्त करून त्या महिलाना अटक केली.या रेकॉर्ड वरिल गुन्हेगार असून त्यांच्यावर जयसिंगपूर ,वडगाव ,हुपरी शाहुपुरी,शिरोली MIDC ,कुंरुदवाड ,सातारा शहर आदी ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.