डॉक्टर अशोक ठोमके राष्ट्रीय आदर्श समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 भरत शिंदे : प्रतिनिधी

   इचलकरंजी येथील एक सामाजिक कार्यकर्ते धडाडीचे नेतृत्व असणारे डॉक्टर अशोक ठोमके यांना प्रेस लाईव्ह मीडियाच्या वतीने दिनांक २०/८/२०२३ रोजी पुणे येथील आझम कॅम्पस मध्ये विद्यापीठाचे कुलपती माजी महाराष्ट्र कास्मोपॉलिटश एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष माननीय डॉक्टर पी एस इनामदार माजी आमदार मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस लाईव्ह मीडियाचे वृत्तवाहिनीचे प्रमुख मेहबूब सर्जेखान यांच्या उपस्थिती मध्ये डॉक्टर अशोक ठोमके यांना समाज रत्न प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

 त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेल्या कामाची उन्नती बद्दल करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा त्यांच्या या धडाडीच्या व सामाजिक काम करण्याची तळमळ या गुणांचा आणि निष्ठावान जागरूक नागरिक म्हणून आपणास प्रमुख उपस्थितीच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करीत आहोत तसे वृत्त वाहिनीचे प्रमुख महबूब सर्जेखान यांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्व मान्यवर प्रेस मीडियाचे सर्व टीम व इतर विविध कलागुणांचे पुरस्कारकर्ते उपस्थित होते

        

Post a Comment

Previous Post Next Post