"खाकी वर्दीतील देव माणूस"



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर : शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बक्कल नंबर 434 कोळेकर यांना आज रोजी सकाळी 09:00 वा ते रात्री 21:00 वा पावेतो तावडे हॉटेल याठिकाणी फिक्स पॉईंट कर्तव्यावर नेमण्यात आलेले होते. पोलीस हवालदार/ कोळेकर हे सदर ठिकाणी कर्तव्य बजावत असताना सायंकाळी सुमारे 19:00 वा.च्या सुमारास एक मारुती कार रस्त्यावर येऊन थांबली व त्या कार मधून एक महिला मोठ्याने ओरडत असताना त्यांनी पाहिले. लागलीच कोळेकर यांनी त्या कार जवळ जावून पाहिले असता कार चालक विलास मुळीक राह-क्रशर चौक,कोल्हापूर हे स्टिअरिंग धरून गप्प बसलेले दिसले म्हणुन त्यांनी त्यांच्या कडे काय झाले याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या डोळ्यास अंधारी आली असून गाडी चालवता येत नसल्याचे सांगितले व माझी गाडी तुम्हीच चालवा असे सांगितले. सदर इसम गाडी चालविण्यास असमर्थ असल्याचे व त्यांना दवाउपचाराची अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणास्तव क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच कार चालवत सुमारे 20 मिनिटातच सदर इसमाला Aster आधार हॉस्पिटलमधे दवा उपचारासाठी दाखल केले.काही वेळात त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमधे आले व पोलीस हवालदार कोळेकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानून " तुम्ही देवा सारखे धावून आलात , तुम्ही खाकी वर्दीतील देव माणूस आहात "असे उद्गार काढले. काही  वेळा नंतर कोळेकर हे पुन्हा त्यांच्या नेमलेल्या पॉईंटवर कर्तव्यावर हजर झाले. 

 पोलीस हवालदार कोळेकर यांनी आपले नियमित कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून पोलीस हा कोणत्याही कामासाठी सदैव तत्पर असतो हेच दाखवून दिलेले आहे. त्यांच्या या कृतीने पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात निश्चितच उंचावलेली आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 

Post a Comment

Previous Post Next Post