सरकारी शाळेचा दर्जा सुधारायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रातील पालकांनी आपली मुले सरकारी शाळेत घातली पाहिजेत.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- सरकारी शाळेत मुले ही जास्त करून गरीब कुंटुबांतील    आणि शेतकरी वर्गाची मुले -मुली शिकत असतांत त्या मुलांचीही इच्छा असते की ,आपण ही शिकून इंजिनीयर,डॉक्टर ,वकील आणि मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न असते .

पण त्याचे पालक कोणी शेतकरी ,हमाली करणारे काबाडकष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा मारुन आपल्या मुलांना शिकवित असतात.त्याच्याकडे डॉक्टर ,वकील होण्यासाठीची फी लाखोंच्या ,कोटीच्या घरात आहे ती येणार कोठून तरीही त्यांची मुले आपल्या आई वडीलांचे काबाडकष्ट वाया न घालवता स्वतःच्या मेहनतीने शिकून मोठे होतात यात काही रिक्षा चालवणारी ,वृत्तपत्र विक्रेत्याची तर काही गंवडी काम,भांडी घासून काम करण्याच्या मुलांचा समावेश असतो.डॉक्टरांची मुले डॉक्टर,वकीलांची मुले वकील ,आणि अधिकारयांची मुले अधिकारी मग शेतकरीवर्गाची ,गरीब काबाडकष्ट करण्यारयांची मुलांच्या स्वप्नाचे काय ? अशांनी सरकारी शाळेचा दर्जा सुधारणार आहे का.अशा  सरकारी शाळेतील काही शिक्षकांची मुले बाहेर इंग्रजी मिडीयमला काहीची खाजगी शाळेत मोठी फी भरून शिकवितात.मग असा शिक्षक वर्ग आपल्या मुलांना का नाही सरकारी शाळेत पाठवत.अशाने सरकारी शाळेची पट संख्या कमी होत नाही का.एकीकडे पटसंख्या वाढ़विण्यासाठी काही शिक्षक भागात फिरुन मुले मुली शोधून त्यांच्या पालकांना आपल्या शाळेत पाठवा म्हणून विनवणी करतात मात्र आपली मुले खाजगीत पाठवितात.तेव्हा सरकारी शाळेचा दर्जा सुधारायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रातील पालकांनी आपली मुले ही सरकारी शाळेतच पाठविली पाहिजेत आणि संबंधित विभागानेही बंधनकारक करण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post