पोलिस दलाच्या वतीने वृक्षारोपण .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

    कोल्हापुर- पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालय येथे पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले."झाडे लावा झाडे जगवा "  या उपक्रमाच्या आधारे 200 वृक्ष लावण्यात आले.यात पिंपळ वड सागवान फणस कडुनिंब आणि बदाम यांचा समावेश आहे.यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,पोलिस उपअधीक्षक(गृह)    प्रिया पाटील राखीव पोलिस निरीक्षक राजकुमार माने यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post