प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर - मोबाईल फोडल्याच्या रागातुन रायाप्पा नावाच्या या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्या प्रकरणी मानतेश उर्फ संजू बसलिंगाप्पा व्हांराटे (वय 33 ,रा .सुंदोळे,गोकाक ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आणि जुना राजवाडा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने त्याला अटक करून 18 तासात लहान मुलाची सुटका केली.
अधिक माहिती अशी की,महालक्ष्मी पार्क येथे निखील ढ़ेरे यांचे बांधकाम सुरू आहे.या ठिकाणी करयाप्पा सिध्दापा मरगळी हा कुंटुबासमवेत रहाण्यास आहे.त्याना रायाप्पा नावाचा तीन वर्षा मुलगा आहे.त्याची संजू नावाच्या इसमाशी तोंड ओळख असून या ओळखीतुन संजू याने 31/7/23 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रायाप्पाला वडा पाव खाण्यास घेऊन जातो म्हणून सोबत घेऊन गेला.बराच वेळ झाला तरी रायाप्पा घरी आला नसल्याने त्याची शोधाशोध सुरू केला असता सापडला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली .या अनुशंगाने तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला सदरचा आरोपी त्या मुलाला घेऊन एसटी बस स्थानकात येत असल्याची माहिती मिळाली असता तेथे जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोबाईल फोडल्याच्या रागातुन हे कृत्य केल्याची कबुली दिली असता त्याला अटक करून त्या मुलाची सुखरुप सुटका करून त्याच्या आई -वडीलांच्या स्वाधीन करुन आरोपीला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे यांच्यासह त्यांच्या पथकाने आणि जुना राजवाडा पोलिस यांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 18 तासात छडा लावून लहान मुलाची सुखरुप सुटका करून आरोपीस अटक केली.