बहादुरवाडी विद्यालय बहादुरवाडी " येथे 15 दिवसांची आंतरवासिता संपन्न .



प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठवडगाव येथे बी.एड प्रथम वर्षातील सेमिस्टर -2 मधील शालेय आंतरवासिता टप्पा क्र- 1,प्रात्यक्षिकांतर्गत गट क्रमांक 1 "बहादुरवाडी  विद्यालय बहादुरवाडी " येथे 15 दिवसांची आंतरवासिता संपन्न झाली.

ही आंतरवासिता दिनांक १०/७/२०२३ पासून सुरू करण्यात आली होती या आंतरवासितादरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययन अध्यापन, बरोबर वेगवेगळे उपक्रम राबवले यामध्ये निबंध स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,प्रश्नमंजुषा , वृक्षारोपण,आरोग्य तपासणी यासारखे विविध उपक्रम राबवले होते सोमवार दिनांक 24 /7 /2023 रोजी आंतरवासिता सांगता समारंभ संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे-विजयकुमार घोरपडे दादा .संचालक- दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी, अध्यक्षस्थानी श्री गायकवाड. एस . एच. मुख्याध्यापक बहादूरवाडी विद्यालय बहादूरवाडी,तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये बी.एड.महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ . निर्मळे आर .एल.मॅडम व प्रा. सोरटे एस .के. तसेच इतर उपस्थितीमध्ये प्रा. शिरतोडे व्ही. एल .,प्रा. सौ. सावंत ए .पी.,प्रा. चरणकर जे. एस .विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंतरवासिता गटातील छात्र अध्यापक छात्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या गटाची शालेय आंतरवासिता टप्पा क्र.1हे प्रात्यक्षिक प्राध्यापक श्री.सोरटे एस.के. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी पाटील व स्नेहल करांडे डे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आंतरवासितेमध्ये जरी छात्राध्यापक शिकवण्याचे काम करत असले तरी ते स्वतः अनुभवातून खूप काही शिकत असतात.  असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष बहादुरवाडी विद्यालय बहादुरवाडी चे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी मांडले , तसेच संस्थेचे संचालक-विजयकुमार घोरपडे दादा यांनी बी.एड. छात्राध्यापकांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी छत्राध्यापक सरिता चव्हाण यांनी आभार मानले अशा प्रकारे ही पंधरा दिवसांची आंतरवासिता अगदी व्यवस्थित रित्या पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post