प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-कनाननगर येथे एका महिलेने दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्या मुलांच्या नातेवाईकांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.रुपाली नितीन खाडे (वय 11)आणि भिमा मोहन कुचकोरवी (वय 12 . दोघेही रा.कनाननगर) अशी त्या मुलांची नावे आहेत.
ही दोन्ही मुले रविवारी जवळच असलेल्या बागेत खेळण्या साठी गेली होती. त्यानंतर ती गायब झाली.त्या परिसरात येणारया महिलेने या दोन मुलांना पळवून नेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या घटनेनंतर ती महिलाही गायब झाली आहे.या मुलांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.अशीच घटना सात आठ वर्षांपूर्वी टाऊन हॉल परिसरातुन एका फळ विक्रेत्या महिलेचे दोन वर्षांचे मुल गायब झाले होते त्याचा ही अजून शोध लागला नाही.