आत्महत्या हा पर्याय नाही.

      


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापुर- आपण रोज कुठे ना कुठे आत्महत्या झाल्याच्या बातम्या वाचीत असतो.कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने आत्महत्या सारख्या घटना घडत असतात.कुणी लग्नं ठरत नाही म्हणुन ,तर कुणी नोकरी लागत नाही म्हणून,तर कुणी कर्ज फिटत नाही म्हणून आत्महत्या केल्या जात आहेत

पण आत्महत्या हा पर्याय नाही.याला मोठ्या हिमतीने संकटाला तोंड द्यावे.जन्म हा आयुष्यात माणसाला एकदाच मिळतो.कर्ज आज ना उद्या फिटेल.उकिरड्यांचा तो पांग फिटतो असं म्हणतात मग आपण तर माणसं आहोत.आपल्या आयुष्यात चढ़उतार असतोच आज टोअम्याटो ला चांगले दिवस आलेत उद्या आपल्याला ही येतील अशी आशा बाळगली पाहिजे.या जगात पैशा शिवाय काहीच होऊ शकते असे आपण म्हणतो मात्र प्रत्यक्षात आर्थिक परिस्थिती उदभवते त्या वेळेस रात्र रात्र झोप लागत नाही.सतत चिंता आणि टेंशन आलेलं असतं अशा परिस्थितीत आपण हतबल होतो आणि भावनिक होऊन चुकीचं पाऊल त्यामुळे त्यांच्या कडून उचललं जाण्याची शक्यता असते.आपल्याला जगण्या साठी थोडा तरी हातात पैसा असण्याची गरज आहे.पैशाची अडचण असेल तर जमा खर्चाचा ताळमेळ बसत नाही.त्या वेळी आर्थिक प्रश्न सुटत नाही.त्या वेळी शांत राहूनच मार्ग काढ़ायला पाहिजे .

अशा वेळी जर तुम्ही शांत राहूनच अशा परिस्थितीतून मार्ग काढ़ू शकतो.त्यासाठी घरातल्याशी किंवा पती /पत्नीशी चर्चा करून मार्ग निघू शकतो.तुम्हाला मोकळं वाटू लागेल .आराम रहाण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला मार्ग सापडू शकेल.आपल्याला जी गोष्ट चांगली वाटते ती करण्याचा प्रयत्न करा .म्हणजे तुम्हाला आनंद वाटून परत एकदा शुन्यातून विश्व निर्माण करू शकू .अशा वेळी बाहेर फिरुन आलं पाहिजे.तुमच्यावर अवलंबून असलेल्यांचा विचार करावा .कुंटुबा समवेत वेळ घालवावा .आपण अशा वेळी मदत हवी असेल तर आपल्या नातेवाईकांशी किंवा मित्राशी मन मोकळं करून त्यातुन योग्य तो निर्णय घेऊन संकटावर मात करा पण घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये.पूर्ण वेळ देऊन मगच निर्णय घ्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post