प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-शिरोळ तालुक्यातिल चिपरी येथे झालेल्या खून प्रकरणी विशाल बाळासो कांबळे (वय 25रा .तमदलगे ).याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली.अधिक माहिती अशी की,24/08/23 रोजी हॉटेल कॉर्नर राजेश रुग्वाल यांच्या मोकळया जागेत संतोष रामदास जावीर यांचा खून झाला होता.
याप्रकरणी निमशिरगावचे पोलिस पाटील रामचंद्र साजणे यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणाचा तपास जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर व त्यांचा स्टाफ आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण,कोल्हापूर यांनी संयुक्तरित्या तपार करीत असताना हा खून तमदलगे येथील विशाल कांबळे यांने केल्याचे समजले वरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दीड महिन्या पूर्वी झालेल्या वादातुन खून केल्याची कबुली दिली अ सता त्याला पुढ़ील चौकशी साठी जयसिंपूर पोलिसाच्या स्वाधीन केले.ही कारवाई मा.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधिक्षक मा.निकेश खाटमोडे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे.