प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- हातकंणगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे शौचालयाच्या पाईपला गळफास लावून विजय आनंदा परीट (वय 32) याने आत्महत्या केल्याचे त्याच्या वडीलांना समजताच त्यांचे वडील आनंदा परीट (वय 60) यांचा ही धक्का बसून मृत्यु झाला.या दोघांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
विजय हा एमआयडीसीत नोकरीला होता.तो गेल्या काही दिवसांपासून नैराशेत होता.त्याने सोशल मिडीया वर स्टेटस ही ठेवले होते.पंरतु आत्महत्येचे कारण समजले नाही.ही घटना घडताच काही वेळानंतर वडील आनंदा परीट यांचे ही निधन झाले.या दोघांच्या निधनानंतर त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची माहिती श्रीरंग परीट यांनी हुपरी पोलिस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास उपनिरीक्षक हजारे करीत आहेत.