प्राथमिक शाळेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि शाळेच्या शिपायाला 45 हजारांची लाच स्विकारताना तिघे जण ताब्यात.

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

कोल्हापुर :  प्राथमिक शाळेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि शाळेच्या शिपायाला 45 हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपतच्या पथकाने या तिघांच्यावर कारवाई करुन ताब्यात घेतले.त्या प्राथमिक शाळेचा अध्यक्ष अजित उध्दव सुर्यवंशी मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील आणि शिपाई अनिल बाळासो टकले अशी कारवाई झालेल्याची नावे आहेत..

अधिक माहिती अशी की ,शिरोळ तालुक्यात धरणगुत्ती येथे असलेल्या आण्णासाहेब विभूते विध्यामंदीर प्राथमिक शाळा असून या शाळेत तक्रारदार महिला शिक्षीका कार्यरत आहे. या शिक्षीकेकडे या शाळेचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी 95 हजार रुपयांची लाचेची मागणी दोन हपत्यात देण्याची मागणी केली होती.या शिक्षेकेने लाचेची रक्कम न दिल्याने वेतनवाढ रोखण्याची धमकी देत ती रक्कम मुख्यापक महावीर पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले पाटील यांनी ती रक्कम शाळेचा शिपाई टकले यांच्याकडे देण्यास सांगितले असता या शिक्षेकेने 17 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.या विभागाने खात्री करून बुधवारी सापळा रचून शिक्षेकेडुन लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडून  या तिघां जणावर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक संजय बम्बग्रेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post