प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापुर- कोल्हापुर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून के.मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या बुधवारी ता.23 रोजी आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार आहेत. गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विना कार्यरत होती.
आयुक्त नसल्यामुळे शहरातील विकास कामेही ठप्प होती. कोल्हापूर महानगरपालिकेला लवकरात लवकर आयुक्त मिळावा म्हणून काही संघटनानी आंदोलन करून त्याचा पाठपुरावा ही केला होता तर काहीनी थेट मुख्यमंत्री यांनाही निवेदन दिले होते.अखेर राज्य शासनाने आज सकाळी आदेश काढ़ून के.मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तत्कालीन आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडे याही गोंदियाच्या जिल्हाधिकारी होत्या.आता के.मंजूलक्ष्मी याही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी आहेत.