महाराष्ट्र शासनाच्या महिला जिल्हा सल्लागार म्हणून स्वाती काळे यांची निवड



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापुर- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या कडून सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती मध्ये अशासकीय सदस्य म्हणून सिध्दार्थ नगर येथील आयु.स्वाती मंगेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

महिला विषयी सामाजिक  फायदे आणि महिला धोरणांचा प्रभावी अंमलबजावणी करीता जिल्हास्तरावरील सर्व समित्या पूर्णरचित करून जिल्हास्तरावर सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिरी मा.राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली स्वाती मंगेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली.स्वाती काळे या चळवळीत सक्रीय सहभागी असतात तसेच सामाजिक सांस्कृतिक  क्षेत्रात,अग्रेसर असून त्या महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवुन दिला आहे.समाजातिल प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न करतात.या त्यांच्या कामाची दखल घेऊन.त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post