प्रेस मीडिया लाईव्हच्या वर्धापन दिनानिमीत्त डॉ.पी.ए.इनामदार यांना राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार

  कोल्हापूरचे दै.पुढ़ारीचे क्राइम रिपोर्टर दिलीप भिसे यांना उत्कृष्ट शोध पत्रकार पुरस्कार.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापुर- पुणे येथे झालेल्या प्रेस मीडिया लाईव्हच्या तिसऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राजकीय ,सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.राष्ट्रीय पुरस्काराचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलूपती आणि या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांचा डॉ.सप्तर्षी यांच्या हस्ते आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र आणि पगडी देऊन सन्मान करण्यात आला तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . 

या वेळी पुरस्कारकर्ते आपल्या कुंटुबांसमवेत उपस्थित होते.डॉ.पी.ए.इनामदार आपले मनोगत व्यक्त करताना एक कर्तव्य म्हणून आम्ही दांपत्यानी योगदान दिल्रे आहे.यात कोणताही जातीयवाद,धर्मवाद आणि प्रांतवाद आमच्या कॅम्पस  मध्ये मानत नाही.आम्ही योगदान देऊ शकलो यांचे सारे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यानी लिहिलेल्या राज्य घटनेला आहे.आपण सर्व जण मिळून कार्यरत राहिले पाहीजे.मी विजापूरचा असून आमच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती.पुण्यात येताना फक्त 150 रु.घेऊन आलो होतो. माझ्या पत्नीचे मिसेस इनामदार यांचे फार मोठे योगदान आहे त्यानी या कामात स्वतःचं दागिने मोडून संस्था उभारण्यात मदत केली.त्या वेळी फक्त 500 विद्यार्थी होते त्यात ही 250 मुली होत्या.आता त्याचा वटवृक्ष वाढ़त जाऊन 27 हजार विध्यार्थी शिक्षण घेत आहेत ही आमची एकमेव शिक्षण संस्था असल्याचे सांगितले.

या वेळी महाराष्ट्राच्या जिल्हयातील विवीध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.यात कोल्हापुरातील दै.पुढ़ारीचे क्राइम रिपोर्टर दिलीप भिसे ,दै.पुण्यनगरीचे बाळासो पाटोळे,आरुण जमादार ,दाऊद भाई पाटणकर ,Adv.प्रशांत शिंदे आणि डॉ.कृष्णात सांगळे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज मुल्ला यांनी केले. या वेळी पुणे येथील राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ,नगरसेवक यांच्यासह प्रेस मीडियाचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान व मीडीयातील सर्व पत्रकार तसेच कोल्हापुर येथील प्रेस मीडियाचे  रिपोर्टर मुरलीधर कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post