आरोग्य विभागाकडुन उपाय योजना करण्याची नागरिकांतुन मागणी .
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-शहरात आता डेंगू पाठोपाठ आता डोळ्याच्या साथीने आता नागरिक त्रस्त झाले आहेत.या साठी आरोग्य विभागाकडुन उपाय योजना करण्याची नागरिकांतुन मागणी होत आहे.ज्या ठिकाणी डोळ्याची साथ आहे आणि जास्त प्रमाणात रुग्ण आढ़ळत आहेत त्या ठिकाणी स्वच्छता करून उपाय योजना करण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडकीप दिल्याने डासांचा उपद्रव वाढ़ला अ सून तसेच पावसाने चिखल चिलटांचा आणि माशांचा वाढ़त्या प्रसारामुळे त्या भागात आरोग्य विभागाने स्वच्छतेची आणि यावर उपाय योजना करण्याची नागरिकांतुन मागणी होत आहे.रुग्ण असलेलया परिसरात औषध फवारणी औष्णिक धुरीकरण करून महापालिकेच्या सर्व रुग्णालयात डेंगूच्या तपासणी करीता आवश्यक असलेले रयापिड किट उपलबध करण्यात यावे .ज्या परिसरात साथ आहे शोध मोहिम घेऊन वरचेवर सूचना देऊन ही डांसाची ठिकाणे नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करण्यारया बांधकाची ठिकाणे गृह सोसाटी दुकाने आणि घराच्या तपासण्या करून त्या ठिकाणी आढ़ळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.डासांची उत्पती होणारी ठिकाणे नष्ट करून त्या ठिकाणी अधिक पथके नेमून दंडात्मक कारवाई करण्यासाठी त्या पथकात आवश्यक मनुष्य बळ वाढ़वुन आवश्यक ठिकाणी वरचेवर तपासणी करून जनजागृती करण्यासाठी मोहिम राबविण्यात यावी.