सुळकुड योजना प्रश्नी आपण शेतकरी आणि कृती समितीच्या पाठीशी

 दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली ग्वाही



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर /प्रतिनिधी:

      इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या सुळकुड अमृत दोन पाणी योजनेला सीमा भागासह शिरोळ तालुक्यातील दुधगंगा काठावरील शेतकरी एकत्र येऊन  विरोध करीत आहेत. या प्रश्नासंदर्भात सर्व नेते मंडळींनी पुढाकार घेऊन तीच ती चर्चा न करता हा प्रश्न कोणत्या पद्धतीने पुढे न्यायचा आणि त्याला दिशा काय  द्यावयाची यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आणि कृती समितीच्या बरोबर अत्यंत खंबीरपणे राहणार असून शिरोळ तालुका मागे हटणार नाही. जिद्दीने पुढे जाऊन यश आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

     पाणी योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी कोल्हापूर येथे दुधगंगा बचाव समिती आणि नेतेमंडळी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये गणपतराव पाटील बोलत होते.

    यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, या प्रश्नावर सर्वांगाने चर्चा झाली आहे. पण पुढची दृष्टी कशी ठेवायची, दिशा कशी हवी हे ठरविण्यासाठी चर्चा करणे गरजेचे आहे. आम्ही सातत्याने कृती समिती बरोबर असणार आहोत. यामध्ये मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या बरोबर राहण्याची दृष्टी ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे तीच ती चर्चा न करता सर्व नेते मंडळींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. शिरोळ तालुका कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसून आम्ही जिद्दीने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि कृती समितीच्या बरोबर शेवटपर्यंत अत्यंत खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी  सांगितले.

     यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास  पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी, प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post