प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारु वहातुक आणि विक्रीस बंदी असूनही बेकायदेशीर दारुची वहातुक केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने राहूल जोतिराम पाटील (51रा.12वी गल्ली राजारामपुरी ,को.)विराज लक्ष्मण वाडकर (20रा.कोलगाव ,सिंधुदुर्ग)यांना अटक करून त्याच्या कडील 7 लाख 41 हजार कि मंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला फुलेवाडी कडुन रंकाळ्याकडे टाटा कंपनीचा टेम्पो नं.MH-04 GJ 0267 या नंबरचा असून ही माहिती मिळालया वरुन या पथकाने रंकाळा परिसरात सदरचा टेम्पो पकडून तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीची वेगवेगळ्या कंपनीची 38 बॉक्स मिळुन आले ह्या मुद्देमालासह टेम्पोही जप्त करून असा 7 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.