प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : सिद्धार्थनगर हे पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असल्या कारणाने आज राजर्षी शाहू समाज मंदिर , सिद्धार्थनगर मध्ये ज्येष्ठ साहित्यिक , विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली वाहून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आयु. स्वाती काळे यांनी प्रा. हरी नरके यांनी आपले संपूर्ण जीवन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर व्यतित केले होते व आपल्या लेखनीतून त्यांनी मनुवाद्यांना सडेतोड उत्तर दिले होते असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मिलिंद सरनाईक , मल्हार शिर्के , मयूर कांबळे अमित सरनाईक , आशिष लिगाडे , जय कांबळे , विक्रांत काळे व गौरव गिरोलीकर उपस्थित होते.