"ईडीला "घाबरुन काहीनी घरे बदलली :शरद पवार

कोल्हापुर येथे झालेल्या सभेत मुश्रीफ यांच्यावर टीका.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-दसरा चौक येथे झालेल्या निर्धार सभेत बोलताना काहीनी ईडीला घाबरुन घरे बदलली पण त्या घरातील महिलांनी जो संयम दाखवला तसा पुरुषांना दाखविता आला नाही अशी टीका मा.शरद पवार यांनी मुश्रीफ यांच्यावर केली.

आताच्या सरकारवर कोणीही समाधानी नाही. महिलाही असुरक्षित आहेत.या सरकारला सत्तेवरुन घालविण्या साठी साथ द्या असे आव्हानही पवार यांनी केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दसरा चौक येथे झालेल्या निर्धार सभेत बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.छत्रपती शाहू महाराज होते.या फुटाफुटीच्या राजकारणानंतर पवार साहेब यांची कोल्हापूरात पहिलीच सभा असल्यामुळे पवार साहेब काय बोलणार यांची उत्सुकता लोकांना लागून राहिली होती. कोल्हापूरात फेटा बांधून पैलवानानी पवार साहेब येताच शड्डू मारुन त्यांना सलामी दिली.पवारसाहेब पुढ़े म्हणाले माझं अजोळ कोल्हापूर असल्याने मी या मातीतलाच आहे.काही दिवसांपासून या इथे बोलंण्याची फार दिवसा पासून इच्छा होती ती आजच्या सभेने पूर्ण होत आहे.दसरा चौक येथे लावलेले पोस्टर्स लक्ष वेधून घेत होते.

या वेळी शहर अध्यक्ष आर.के.पोवार यांनी करून प्रास्ताविक व्ही.बी.पाटील यांनी केले.यावेळी मा.रोहित पवार,मा.जितेंद्र आव्हाड यांच्यासह ईतर मान्यवरांची ही भाषणे झाली.शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले.पोलिस अधीक्षक श्री.महेंद्र पंडीत यांनी सभेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post